Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आता युतीचा आणखी एक नवा प्रयोग पहायला मिळणार आहे. एकीकडे शिवशक्ती(shivshskati) आणि भीमशक्ती(bhimshkati) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जबरदस्त खेळी केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती अस्तित्वात येण्याआधीच या युतीला टक्कर देण्याची रणनिती शिंदे गटाने आखली आहे. यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे गट(Eknath Shinde group) हा जोगेंद्र कवाडेंच्या(Jogendra Kawade) पीपल्स रिपब्लिकन पार्टी(People's Republican Party) यांची युती पहायला मिळणार आहे.
राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची बोलणी सुरु आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेसेनेला शह देण्यासाठी जबरदस्त प्लान आखला आहे.
एकनाथ शिंदे गट जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घेऊ शकतो. खुद्द जोगेंद्र कवाडेंनी यासंबंधी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने योग्य प्रस्ताव दिला तर त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे असं विधान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरेसेनेच्या वंचित फॅक्टरला शिंदे गट जोगेंद्र कवाडे यांच्याशी हातमिळवणी करुन जशास तसे उत्तर देणार असल्याची चर्चा आहे.