यवतमाळ : राज्यात सुरु असलेल्या अघोषित भारनियमनाचा फटका राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या त्यांच्याच मतदारसंघात बसला.
भोसा इथे मदन येरावार यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन कार्यक्रम सुरु असतानाच, अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि कार्यक्रमस्थळी अंधार पसरला. गेल्या ५ दिवसांपासून यवतमाळमध्ये कधीही वीज गुल होण्याचं प्रमाण वाढलं असून, ग्रामीण भागातल्या लोकांना १६ तास भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.
अखंडित वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले असून, शेतीच्या सिंचनासोबतच कार्यालयीन कामकाजही प्रभावित झालं आहे. तर व्यापारीवर्गही चांगलेच हैराण झालेत. दरम्यान राज्यावरचं विजेचं संकट जास्त कालावधीसाठी राहणार नाही असं सांगत, मदन येरावार यांनी यावेळी मारुन नेली.