तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Updated: Sep 15, 2017, 10:06 PM IST
तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी title=

पुणे : परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंढे यांना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कार्यालयीन टपालातून धमकीचे पत्र मिळाले. याप्रकरणी मुंढे यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुखसागर येथे राहणाऱ्या भुजंगराव मोहिते नावाच्या व्यक्तीने हे पत्र पाठवले असून पत्रामध्ये त्याने मुंढेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. 

तुम्ही मनमानी कारभार करत आहात, तिकिट दर वाढवल्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. तुमचा मनमानी कारभार थांबवा, अन्यथा तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देण्यात आली आहे.