close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना मुद्देमालासह अटक

हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Updated: Jun 27, 2019, 09:00 AM IST
हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना मुद्देमालासह अटक

अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे : हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांना या कारवाईत यश आले असून तस्करांकडून हस्तीदंतासह मुद्देमालही जप्त करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलीसांनी सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानाजवळ ही कारवाई केली. हस्तीदंत तस्करांविषयी पोलिसांना माहीती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

आदित्य संदीप खांडगे (वय १९, देहूफाटा), ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८,पुणे), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय२६,अहमदनगर), अमित अशोक पिस्का (वय २८,अहमदनगर)  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावे आहेत. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त करण्यात आले आहेत. हे हस्तिदंत त्यांनी पुण्यात विक्रीसाठी आणले होते. या हस्तीदंतांची बाजारभावानुसार साडेतीन कोटी रुपये इतकी किंमत आहे.