विधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

Heartbreaking video of monkey kids:  दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (viral video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत. 

Updated: Jul 22, 2023, 09:26 PM IST
विधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी! title=
Emotional video, monkey kids

Monkey kids Viral Video: भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं, कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी सध्याच्या राज्यातील पुराच्या परिस्थितीवर मांडल्या असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निसर्गाचा प्रकोप कोणाला टळलाय? कधी उन्हाची लाहीलाही तर कधी पावसाचं थैमान! माणूस असो वा पशुपक्षी... निसर्गाच्या प्रवाहाचा काडीमोड झाला तर शिक्षा तर होणारच..! सध्या सोशल मीडियावर माकडांचा व्हिडीओ होतोय, हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्राच्या अनेक भागात सध्या पूरपरिस्थिती (Maharastra Flood) दिसून येतीये. नदीचा प्रवाह वाढल्याने पुराचं पाणी घरात शिरलंय. त्यामुळे पुरग्रस्त भागात नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. माणसांचं एक ठिके वो... जनावरांचं काय? गुरंढोरं असो वा जंगली प्राणी सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (Emotional Video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा - Weather Update: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा!

पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं (Heavy rain wet monkey kids) थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत. पुराच्या पाण्यातून आपला कसाबसा जीव वाचवून ही पिल्लं चिखलाने माखलेल्या अवस्थेत दिसत आहेत. थंडीने कुडकुडत रस्त्याच्या एका कडेला एकमेकांना मिठी मारून बसलेलं पाहिल्यावर एका व्यक्तीला माकडांच्या पिल्लांची दया आली. त्यांनी माकडांच्या पिल्लांना दुध पाजलं. माकडांचे डोळे पाहून (Emotional Video Viral) अनेकांच्या डोळ्यात टचकट पाणी आलंय.

पाहा Video

दरम्यान, पिल्लांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. देव कशी बुद्धी देत असेल एवढ्या छोट्या जीवांना एकमेकांना समजून घेण्याची, लास्टला आपलं दूध पिऊन झाल्यावर तो पिल्लू दुसऱ्या पिल्लाला हात लावतो, किती छान वाटत बघून ते, टचकन पाणी आले डोळ्यातून... एवढंच जर माणसाने माणसाला समजून घेतलं तर..., असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर हृदययाला अलगद स्पर्श करून जाणारी गोष्ट... ज्याने मदत केली त्याला देव खरच खूप आशीर्वाद देईल, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.