नायलॉन मांजा कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

जीवघेण्या नायलॉन मांजाविरुद्ध मोहिम  

Updated: Dec 22, 2021, 07:06 PM IST
नायलॉन मांजा कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना title=

नागपूर- नायलॉन मांजाने नागपुरात दरवर्षी बळी जातात अनेक जण गंभीर जखमी होतात. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन मांजा वापरण्यास बंदी घातली आहे. नायलॉन मांजा वापरण्यात बंदी असतानाही मात्र शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा  वापरला जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन जागे झाले असून आता जिल्हाधिकारी आर विमला यांनी या संदर्भात एक निर्देश काढून समिती घोषित केलीआहे.मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्देश देताना न्यायालयाने विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी आर विमला यांनी नागपूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती करणे,
बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे,तसेच नायलॉन  मांजा उत्पादन करणाऱ्या ठिकाणांना शोधून कारवाई करणे,यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
महानगरपालिका आयुक्त
 पोलीस विभागाच्या विशेष शाखेचे उपायुक्त नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 
सायबर सेल प्रमुख पर्यावरण व प्रदूषण विभाग नागपूर मेट्रो विभाग तसेच जिल्हा 
प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा यांचा समितीमध्ये सहभाग असेल. ही समिती येणाऱ्या काळात शहरातील या दुर्घटने संदर्भात बारकाईने लक्ष देईल.

 जिल्हाधिकारी यांनी नायलॉन मांजा न वापरता पतंगोत्सव साजरा करा , घरातील वडीलधाऱ्यांनी आपला मुलगा कोणता मांजा वापरतो याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

 नायलॉन मांजामुळे प्राध्यापक गंभीर जखमी

जीवघेण्या  नायलॉन मांजामुऴे नागपुरातील एक प्राध्यापक गंभीर जखमी झालेत..किंबहुना त्यांचा जीव धोक्यात आला होता. राजेश क्षीरसागर असे जखमी प्राध्यपकाचे नाव आहे. नागपूरच्या सदर उड्डाणपुलावर
रविवारी दुचाकीने जात असताना अचानक  गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याचे त्यांच्या लक्षातआले.त्यांनी प्रसंगवधान रहात तातडीनं गळ्यातील मांजा दूर सारला मात्र यामध्ये त्यांच्या
 उजव्या हाताच्या दोन बोटाला गंभीर दुखापत झालीय.. त्यांच्या दोन बोटं मांजामुळं कापल्या गेलीत.प्राध्यापक क्षीरसागर यांचा जीव बचावला,मात्र या घटनेमुळं ते पुरते हादरले आहे.
 मांजानं उजव्या हाताचा मधले बोट आणि अंगठा कापला गेल्याने दुखापत झाली. शिवाय गळ्यावरही गंभीर इजा झाली.