आजोबांना मानलं बुवा, या वयातही नाचले असं की ... नाद करायचा नाय...

बैल गाडा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय... याच बैलगाडा शर्यतीवर राज्यसरकारने काही अटी बंदी घातली होती. 

Updated: Apr 21, 2022, 06:19 PM IST
आजोबांना मानलं बुवा, या वयातही नाचले असं की ... नाद करायचा नाय...    title=

जुन्नर : बैल गाडा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय... याच बैलगाडा शर्यतीवर राज्यसरकारने काही अटी बंदी घातली होती. या बंदी उठल्यापासून धुरळा उडवत सर्वत्र बैल गाडे घाटात पळताना दिसताहेत.

जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी गावच्या श्री गारुडीबाबा आणि चारंगबाबा यात्रे निमित्त सुधाकर पोटे आणि सीमा पोटे यांच्या ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. या बैल गाड्यावरील गाण्यावर तरुणांना सोबत आजोबा ही थिरकले.

या आजोबाचे बैलगाडा शर्यतीवर प्रेम तर आहेच याशिवाय त्यांनी फ्री स्टाईल नाचत अशा धूम माजविली की... हा व्हिडीओ पहाच