एक्स्प्रेस हायवेवरचे हाईट बॅरिकेड्स पहिल्याच दिवशी तुटले

एक्स्प्रेस हायवेवर लेन कटिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि स्पीड लेनमधून हलकी वाहने सुसाट जाण्यासाठी खालापूर टोलनाका ते लोणावळादरम्यान लेन क्रमांक एकवर हाईट बॅरिकेड्स  बसवण्यात आले होते. 

Updated: Jun 25, 2017, 06:57 PM IST
एक्स्प्रेस हायवेवरचे हाईट बॅरिकेड्स पहिल्याच दिवशी तुटले  title=

लोणावळा : एक्स्प्रेस हायवेवर लेन कटिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि स्पीड लेनमधून हलकी वाहने सुसाट जाण्यासाठी खालापूर टोलनाका ते लोणावळादरम्यान लेन क्रमांक एकवर हाईट बॅरिकेड्स  बसवण्यात आले होते. मात्र पहिल्याच दिवसापासून अवजड वाहनांकडून हे बॅरिगेट्स तुटत आहेत.

खालापूरच्या टोलनाक्याजवळील किमान 5 ते 7 हाईट बॅरिकेड्स तुटलेत. त्यामुळे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांच्या या प्रयोगात त्रुटी आढळून आल्या आहेत. तसंच हाईट बॅरिकेड्समध्ये सुधारणा करण्याची गरज वाहनचालकांनी व्यक्त केलीय.