शांतीगिरी महाराजांच्या भक्तांच्या मतांवर उमेदवारांचा डोळा

शांतीगिरी महाराजांचा नाशिक आणि औरंगाबादमध्ये मोठा भक्तपरिवार आहे

Updated: Apr 16, 2019, 12:07 PM IST
शांतीगिरी महाराजांच्या भक्तांच्या मतांवर उमेदवारांचा डोळा  title=

किरण ताजणे, नाशिक : शांतीगिरी महाराजांचा नाशिक आणि औरंगाबादमध्ये मोठा भक्तपरिवार आहे. या भक्तांच्या मतांवर उमेदवारांचा डोळा आहे. त्यामुळं निवडणूक जाहीर झाल्यापासून जवळपास सगळ्याच उमेदवारांनी आशीर्वादासाठी शांतीगिरी महाराजांकडे धाव घेतली आहे. शांतीगिरी महाराजांच्या पायावर उमेदवार लोटांगण घालत आहे. उमेदवारांचा भक्तांच्या मतांवर डोळा आहे महाराजांचाही सगळ्याच उमेदवारांना आशीर्वाद दिसतो आहे.

शांतीगिरी महाराजांचा नाशिक आणि औरंगाबाद पट्ट्यात मोठा भक्तपरिवार आहे. निवडणुकीतल्या उमेदवारांचा या भक्तपरिवाराच्या मतांवर डोळा जाणार नाही असं होणार नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय उमेदवारांनी शांतीगिरी महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं आहे. शांतिगीरी महाराजांनीही जो उमेदवार येईल त्याला विजयी भवःचा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळं शांतीगिरी महाराजांनी आपल्यालाच आशीर्वाद दिला आहे असा दावा प्रत्येक उमेदवार करू लागला आहे.

शांतीगिरी महाराजांनाही निवडणूक लढवायची होती. पण काही कारणानं त्यांनी माघार घेतली. शांतीगिरी आश्रम मात्र मोदींच्या पाठिशी उभं असल्याचं सांगतो. शांतीगिरी महाराजांसोबतचे सगळ्याच उमेदवारांचे फोटो समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळं शांतीगिरी महाराजांचे भक्तही गोंधळात पडले आहेत.