लातूरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. औसा आणि निलंगा भागाला पावसानं झोडपून काढलं.  यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. औसा तालुक्यातील किल्लारी येथे वीज पडून शेतकरी असलेल्या राम माधव बिराजदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Updated: Apr 16, 2018, 10:30 AM IST
लातूरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू title=

लातूर : लातूर जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. औसा आणि निलंगा भागाला पावसानं झोडपून काढलं.  यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. औसा तालुक्यातील किल्लारी येथे वीज पडून शेतकरी असलेल्या राम माधव बिराजदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

शेतात झाडाखाली आडोशाला बसले असताना राम बिराजदार यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. तर तीन जनावरांचाही मृत्यू झाला. महसूल विभागातर्फे पंचनामे करण्यात येत आहेत. 

ऐन उन्हाळ्यात अशा पद्धतीने अवकाळी पाऊस आणि वीज अंगावर पडून मृत्यू होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पीडित कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी जोर धरू लागलीय.