येवले चहा पिताय, तर हे वाचाच

पण, आता मात्र.... 

Updated: Jan 22, 2020, 12:26 PM IST
येवले चहा पिताय, तर हे वाचाच
येवले चहा

मुंबई : चहा म्हणजे अनेकांचं आवडतं पेय. कित्येकांच्या दिवसांची सुरुवात या पेयाने होते. अशा या चहाप्रेमींच्या विश्वात येवले अमृततुल्य हे नाव गेल्या काही वर्षांमध्ये चांगलंच नावारुपास आलं. पुण्यासह मुंबईतही या चहा विक्रेत्यांच्या काही शाखा सुरु करण्यात आल्या. पण, आता मात्र येवले अमृततुल्यसाठी धोक्याचा इशारा मिळाला आहे. लोकप्रियतेच्या निकषांवर खरा उतरलेला येवलेंचा चहा हा भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक खुलाला नुकताच करण्यात आल्याचं कळत आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालातून ही बाब उघड करण्यात आली आहे. येवले अमृततुल्य चहामध्ये रंगाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मुख्य म्हणजे फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियामक तत्वांनुसार रंगाचा वापर करणं चुकीचं आहे त्यामुळे ही बाब त्यांना अडचणीच आणणार आहे. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

दरम्यान, येवले चहाची कोंढवा येथील शाखा बंदच ठेवण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आले होते. हा चहा आरोग्यवर्धक असल्याचं सांगत तो तयार करण्यासाठी 'मिनरल वॉटर'चा वापर करण्यात येतो असा दावा करणं त्यांना अडचणीत आणणारं ठरलं होतं. य़ेवले चहाविषयीची अशी माहिती समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही चहामध्ये मेलामाईनच्या वापराची चर्चा होती, जे आरोप येवले चहाशी संबंधित व्यक्तींकडून  नाकारण्यात आले होते.