दुष्काळी भागात कोथिंबीरची लागवड, अल्प शेतीवर लाखोंचे उत्पन्न

अल्प शेतीवर लाखोचे उत्पन्न 

Updated: Jul 22, 2019, 02:14 PM IST
दुष्काळी भागात कोथिंबीरची लागवड, अल्प शेतीवर लाखोंचे उत्पन्न title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भाग असलेल्या जिल्ह्यात एका शेतकऱ्याने अल्प शेतीवर लाखोचे रुपये उत्पन्न काढले आहे. या शेतकऱ्याची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महाळंगी या गावातील महादेव गोपाळ ढवळे या शेतकऱ्याने आपल्या तीन एक्कर शेतात तीस हजार रुपये खर्च करून कोथिंबीरची लागवड केली होती.

कोथंबरीमधून तब्बल 6 लाख 11 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. ढवळे यांनी 8 जून रोजी कोथिंबीर लावली होती. त्यांना फक्त 45 दिवसात हा नफा झाला आहे. ढोरे यांना यासाठी बियाणे, पेरणी, खुरपन आणि मंजुरी असे एकूण 40 ते 50 हजार रुपये खर्च आला तर यातून त्यांना निवळ नफा 5 लाख 60 रुपये मिळालं आहे.

खरीप हंगामात साधारणतः सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या सारखे पिकं घेत असतात. मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस पडत नसल्याने आणि या पिकांचा कालावधी जास्त असल्याने ढवळे यांनी कमी कालावधीत आणि कमी पाण्यात निघणाऱ्या पिकाची निवड केली. 

शेतकऱ्यानं म्हटलं की, मला आतापर्यंत कोणत्याच पिकात इतका नफा मिळाला नव्हता. मात्र यंदा कोथिंबीरीने मला लखपती केले. आता या पैशातून मी माझ्या कुटुंबाचं व्यवस्थापन करणार आहे. त्याच बरोबर मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे ढवळे यांनी म्हटले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होता.