चोर समजून नागरीकांचा एका प्रियकराला बेदम चोप

प्रियकराला प्रेयसीला भेटण्यासाठी जाणं पडलं महाग

Updated: Jul 22, 2019, 01:07 PM IST
चोर समजून नागरीकांचा एका प्रियकराला बेदम चोप

विरार : चोर समजून नागरीकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची घटना विरारमध्ये फुलपाडा इथल्या डोंगरी परिसरात घडली आहे. रविवारी रात्री १२च्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मध्यधुंद अवस्थेत प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रीलवर चढून मोठ्या कसरतीने टेरेसपर्यंत पोहोचला. दरम्यान इमारत परिसरात वावरणाऱ्या नागरिकांचे वर चढणाऱ्या या तरुणाकडे लक्ष गेले. 

मागील काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने हा तरुण चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी तरुणाला मारहाण केली. मारहाणीत हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.