मुलाचे अंत्यसंस्कार : मालकाकडून घेतले 500 रुपये, शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात गेला बळी

500 रुपये उसने घेणे जीवावर बेतले, शेतमजुराची आत्महत्या 

Updated: Aug 21, 2021, 12:43 PM IST
मुलाचे अंत्यसंस्कार : मालकाकडून घेतले 500 रुपये, शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात गेला बळी  title=

मुंबई : अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी पालघरमधून. मुलाच्या अंत्यसंस्काराकरता लागणाऱ्या पांढऱ्या कापडाकरता देखील नव्हते पैसे. शेतमजुराने मालकाकडून उसने घेतले 500 रुपये. पण या 500 रुपयांनीच शेतमजुराचा घेतला बळी. त्या महिलेला बाळा पाठोपाठ पतीच्या आत्महत्येचा धक्का. ही अतिशय संतापजनक घटना आहे पालघर जिल्ह्यातील.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 500 रूपयांच्या उसनवारीसाठी शेतमजुराची पिळवणूक करण्यात आली. वेठबिगारीला कंटाळलेल्या या शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल. आत्महत्या करून या शेतमजुराने आपलं जीवन संपवलं आहे.  या राज्यात अजूनही वेठबिगारीमुळे अक्षरशः जीव जात आहेत. धक्कादायक वास्तव सांगणारी ही घटना. 

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वेठबिगारीच्या नावाखाली कशी पिळवणूक सुरू आहे त्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली.  दुर्दैवी कातकरी शेत मजुरासोबत घडला अतिशय धक्कादायक प्रकार.

मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी मालकाकडून ५०० रुपये उसने घेतले होते. ते पैसे  फेडण्यासाठी मालकाने गडी म्हणून या शेतमजुराला राबवत अक्षरशः पिळवणूक केली. अखेर या त्राला कंटाळून शेतमजुराने याने गळफास घेत आत्महत्या केलीय असा आरोप त्याच्या पत्नीने केलाय. या प्रकऱणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.