शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण

शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.

Updated: Jun 1, 2017, 04:55 PM IST
शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण title=

औरंगाबाद : शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.

काही शेतकरी तेथून निघून गेले. या संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत बाजारात आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती नव्हती, ते शेतकरी उद्या संपामध्ये सहभागी होत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.

पाहा व्हिडिओ