हवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार

यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत. 

Updated: Jul 13, 2017, 09:33 AM IST
हवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे  : यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत. शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून  खऱीपाची पेरणी केली.  हवामान खात्याने 16 जुलैला पावसाचा अंदाज व्यक्त केला असून तो अंदाज  चुकल्यास  थेट हवामान खात्याला कोर्टात खेचण्याची तयारी शेतक-यांनी सुरु केली आहे.

कमलेश आणि समाधान हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी  हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाला पूरते वैतागले आहेत. कारण यंदा सरासरीच्या 96 टक्के पावसाचं भाकीत हवामान खात्याने व्यक्त केलं होतं. तसेच जून,जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातील शेतक-यांप्रमाणे कमलेश आणि समाधान यांनी खरीप पेरणी केली. 

मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावासने दडी मारली आहे. पुणे आणि मुंबई वेधशाळा मात्र वारंवार पावसाचा अंदाज व्यक्त करीत आहे. पण प्रत्येक वेळी त्यांचा अंदाज फोल ठरतोय.त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय.तिच अवस्था कमलेश आणि समाधान यांचीही झालीय.पण हवामान खात्याच्या या अंदाजाला कंटाळून चुकीचे अंदाज व्यक्त केल्या प्रकरणी हवामान खात्याला कोर्टात खेचण्याची तयारी  त धुळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.