कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

Updated: Dec 10, 2019, 11:52 AM IST
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक title=

कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.  तक्रार करून देखील आरोपींच्याकडे अडकलेले लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच संतापलेल्या शेतकरी आंदोलन करण्यासाठी सरसावलेत.

कडकनाथ कुकूटपालन व्यवसाय करणारे शेतकरी मुंबईतील आझाद मैदान निदर्शने करण्यासाठी आज रवाना होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी मोटरसायकल येणार आजाद मैदानकडे कूच करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील फसवणूक झालेले शेतकरी काही वेळेत कोल्हापुरातील बिंदू चौकातून मोटारसायकल रॅलीने रवाना होणार आहेत.