१२ लाखाची फॉच्युनर गाडी ५० हजारात घरी... तुम्ही म्हणाल गडी नशिबवान आहे ...पण

मोठ्या ब्रॅण्डची गाडी असावी असं अनेकांचं स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करता आणि आमच्या

Updated: Oct 8, 2021, 10:42 PM IST
१२ लाखाची फॉच्युनर गाडी ५० हजारात घरी... तुम्ही म्हणाल गडी नशिबवान आहे ...पण

पुणे : महागड्या गाडीत फिरावं, आपल्याकडेही मोठ्या ब्रॅण्डची गाडी असावी असं अनेकांचं स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करता आणि आमच्या यांना का नाही जमत असं...असं जर बायको किंवा तुमची जवळची व्यक्ती म्हणत असेल तर ही घटना पाहा. महागडी गाडी आपली असावी, असं म्हणण्यापेक्षा रस्त्यावरुन महागडी गाडी जाते, तेव्हा तिला डोळेभरुन पाहावं आणि समाधान व्यक्त करावं, हेच बरं असं तुम्हाला खालील घटना वाचल्यानंतर नक्कीच वाटेल.

एका मोठ्या शेतकऱ्याने हौस करुन अलिशान फॉर्च्युनर गाडी घेतली, पण काही कारणांनी ती विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग एकाने ही अलिशान गाडी आपण १२ लाखाला घेऊ असं सांगितलं. त्याने त्यांना २ लाख रुपये रोख देण्याचे ठरवले, पण यानंतरही त्यांनी फक्त ५० हजार रुपये दिले. वरचे दीड लाख आणि पुढील १० लाख कर्ज हफ्त्यात देतो असं सांगितलं. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन गडी ५० हजार रुपये देऊन गाडी घरी घेऊन गेला.

आता ५० हजार रुपयात जो व्यक्ती फॉर्च्यूनर घरी घेऊन गेला आहे, तो एकही हफ्ताही भरायला तयार नाहीय. यामुळे शेतकरी साडे अकरा लाखात नाडला गेला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आदेश सुरेश जाचक, राहणार देऊळगाव ताडा, दौड यांच्या तक्रारीवरुन संपत दत्तू खारतोडे, राहणार खारतोडे वस्ती, पाटस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.