तूर खरेदीचा गोंधळ कायम, सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण

यंदाही तूर खरेदीचा गोंधळ कायम आहे. सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. झी 24 तासच्या बातमीनंतर संपूर्ण तूरखरेदीचं अर्थमंत्र्यांचं आश्वासन दिलेय. मात्र, तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नसल्याचं दिसत नाही.

Updated: Feb 6, 2018, 01:49 PM IST
तूर खरेदीचा गोंधळ कायम, सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण title=

औरंगाबाद : यंदाही तूर खरेदीचा गोंधळ कायम आहे. सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. झी 24 तासच्या बातमीनंतर संपूर्ण तूरखरेदीचं अर्थमंत्र्यांचं आश्वासन दिलेय. मात्र, तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नसल्याचं दिसत नाही.

तुरीचे करायचे काय करायचे?

आधी तूर खरेदी केंद्र कधी सुरु होणार आणि आता या केंद्रांवर किती तूर खरेदी करणार असा गोंधळ सुरु आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार औरंगाबादेत एकरी फक्त दोन एकर तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळं एकरी १० क्विंटल तूर उत्पादन झाल्यावर नक्की उरलेल्या तुरीचे करायचे काय असा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांना धिराचा सल्ला

शेतकऱ्यांनी तुरीची चिंता करू नये, त्यांची सगळी तूर सरकार खरेदी करेल असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. एकरी दोन क्विंटल तूर खरेदी सुरु असल्याची वस्तुस्थिती झी मीडियानं माडली. 

त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. सरकारच्या परिपत्रकामुळं गोंधळ झाला असावा मात्र याबाबत तातडीनं सुधारणा करता येईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलीय.