पुणे : महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राचार्याना धमकावून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात घडलीय. आझम कॅम्पस मधील पुना महाविद्यालयात हा प्रकार घडलाय. फारुक शेख तथा गुडडू असं या तरुणाचं नाव असल्याचं कळतंय.. काल दुपारी २च्या सुमारास तो प्राचार्यांच्या कार्यालयात शिरला.आपण सांगू त्या मुलांना ११वीत प्रवेश मिळायला हवा असं सांगत त्यानं थेट कोयता बाहेर काढला आणि प्राचार्यांच्या टोबलावर कोयत्याचे वार करु लागला.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं प्राचार्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो बाहेर निघून गेला. महाविद्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. फारुक शेख विरोधात कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.