धक्कादायक, पित्यानेच दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाच मृत्यू

एक धक्कादायक घटना. किरकोळ वादावरुन पित्यानेच दोन्ही मुलांवर गोळीबार केला.  

Updated: Jun 14, 2021, 10:56 PM IST
धक्कादायक, पित्यानेच दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाच मृत्यू
संग्रहित छाया

नवी मुंबई : एक धक्कादायक घटना. किरकोळ वादावरुन पित्यानेच दोन्ही मुलांवर गोळीबार केला. (Father Fires on his Own two children) यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. गोळी झाडणारा पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नवी मुंबईतील ( Navi Mumbai )  ऐरोली येथे घडली.

गाडीचा इन्श्युरन्स कोण काढणार यावरून हा वाद झाला होता. त्यानंतर पित्यानेच दोन्ही मुलांवर गोळीबार केला. गोळीबार करणारे भगवान पाटील हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यांनी मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मोठा मुलगा विजय पाटील या उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विजय यास 3 गोळ्या झाडल्या तर सुजय याला गोळी घासून गेली. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. मात्र, विजय याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला तात्काळ ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना विजय  या मोठ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निवृत्त पोलीस कर्मचारी पित्यानेच हा गोळीबार केल्याने नक्की काय झाले याची माहिती अधिक मिळू शकलेली नाही. मात्र, गाडीचा इन्श्युरन्स वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.