एका वाघिणीसाठी दोन वाघ भिडले, वाघिणीला जिंकण्यासाठी घनघोर युद्ध, पाहा VIDEO

कॅमेरात कैद झालं दोन वाघांमधलं घनघोर युद्ध

Updated: Apr 28, 2022, 08:41 PM IST
एका वाघिणीसाठी दोन वाघ भिडले, वाघिणीला जिंकण्यासाठी घनघोर युद्ध, पाहा VIDEO title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वाघ म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्याची डरकाळी जरी ऐकली तरी जंगालचे प्राणी सैरावरा धावतात. पण हेच वाघ जर एकमेकांना भिडले तर ही लढाई एखाद्या घनघोर युद्धापेक्षाही कमी नसते. 

मध्यप्रदेशच्या कान्हा अभयारण्यात दोन वाघ आमने-सामने आले. यातल्या एका वाघाचं नाव आहे नीलानाला आणि दुसऱ्याचं नाव आहे. बोईनदाबारा. त्यांच्यातल्या वादाला कारण ठरलीय एक वाघीण. जिचं नाव आहे जिलालाईन. तिच्यासाठीच या दोन वाघांमध्ये घनघोर युद्ध झालं. 

वाघांमधल्या लढाईचा हा व्हिडीओ झी 24 तासच्या हाती लागलाय. ही लढाई मध्य प्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात घडलीय. तब्बल 10 मिनिटं दोघांमध्ये ही फ्री स्टाईल सुरू होती. त्यानंतर हे वाघ जंगलाच्या आतल्या भागात गेले. मात्र  इथं आलेल्या पर्यटकांनी या दोन वाघांमधल्या लढाईचा व्हिडीओ कॅमे-यात कैद केलाय. 

बऱ्याचदा आपला एरिया मार्क करण्यासाठी तसच वाघिणीवर अधिकार गाजवण्यासाठी वाघांमध्ये अशा लढाया होत असतात. नीलानाला आणि बोईनदाबारा यांच्या युद्धात कोण जिंकलं आणि जिलालाईन कुणाला मिळाली हे समजू शकलेलं नाही. मात्र यानिमित्तानं वाघांमधल्या लढाईचा थरार पर्यटकांना जवळून अनुभवता आलाय. कॅमे-यामध्ये वाघांचं हे घनघोर युद्ध  कैद झाल्यानं वन्यजीवप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरलीय.