पुणे : कालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune: FIR registered against Jignesh Mevani and Umar Khalid under section 153(A), 505 & 117 at Vishrambaug Police Station
— ANI (@ANI) January 4, 2018
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी अक्षक बिक्कड आणि आनंद दौंड नावाच्या दोन युवकांनी पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुणे येथे शनिवार वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर लावण्यात आले आहे्त.
जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या भाषणातून एका खास वर्गातील लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवले होते. उमर खालिय यानेही भाषणातून विशेष वर्गाला भडकवले होते. या दोन लोकांच्या भाषणांनंतर विशेष वर्गातील लोक विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलेत. नंतर या घटनेने हिंसेचे वळण घेतले, असा आरोप करण्यात आला आहे.
आमदार जिग्नेश मेवाणी यांनी १४ एप्रिलला नागपूरमध्ये जाऊन आरएसएस मुक्त भारत अभियान सुरू करण्याचं वक्तव्य केलं होतं. या भाषणावेळी भारिप नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, लेखिका उल्का महाजन इत्या उपस्थित होते.