बदलापूरमध्ये इमारतीला आग; जिवितहानी नाही

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Updated: Jul 20, 2019, 06:30 PM IST
बदलापूरमध्ये इमारतीला आग; जिवितहानी नाही title=

बदलापूर : बदलापुरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्व भागातील टी. व्हि टॉवर परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. संतकवी कालिदास अपार्टमेंटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इमरतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचली आणि आग विझवली. ज्यावेळी घराला आग लागली त्यावेळी घर बंद होते. घरात कुणीही नव्हतं. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत घराचं मोठं नुकसान झालं आहे.