पुणे-बंगळुरु महामार्गावर पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री

 पोलीस आणि राजस्थान मधील गुन्हेगारांमध्ये जोरदार धुमचक्री उडाली.

Updated: Jan 28, 2020, 11:45 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि राजस्थान मधील गुन्हेगारांमध्ये जोरदार धुमचक्री उडाली. या चकमकीत तीन आरोपी गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी आरोपींच्या पायावर गोळ्या झाडल्याने त्यातील एका आरोपीची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. पोलिसांना चकवा देत हे सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते.

याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनि किणी टोल नाक्याजवळ सापळा रचला होता. 

रात्री 9 वाजता हे आरोपी किनी टोल नाक्यावर पोहोचले. गुन्हेगारांच्या वाहनाला कोल्हापूर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या दिशेने आरोपींनी फायरिंग सुरू केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनीही फायरिंग केल.

काही काळ ही धुमचक्री झाली, त्यामध्ये तीन आरोपी जखमी झालेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आहे घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली.