First Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श

First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे. 

Updated: Dec 18, 2022, 02:59 PM IST
First Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श title=
first vote then marriage

First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे. तेव्हा अनेकांच्या घरी असलेली लग्न (viral wedding video) पाहता तेथील नववधू आणि नवरदेवांनी आधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मग बोहल्यावर चढले आहेत. सध्या आधी लगीन लोकशाहीचं मग आपलं असा निश्चिय करत या नवरदेव आणि नववधूनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या लग्नाच्या वेषात जात यांनी आपला मतदानाचा (voting) हक्क बजावला आहे. (First Vote Then Marriage bride and bridegroom first voted then married with their partner)

धुळे जिल्ह्यातील फागणे ग्रामपंचायतमध्ये सीमा कुंभार या नववधूने आधी मतदान केले आणि मग ती लग्न मंडपाकडे रवाना झाली. सीमा हिच्या घरी आज लग्न सोहळा पार पडणार असून नवरीच्या शृंगारत (marriage fashion) ती आधी मतदान केंद्रावर आली. सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीनं मतदान केले. मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर ती अन्य वराती सोबत लग्न मंडपात गेली. सीमा ही पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने तिचा उत्साह पाहण्याजोगा होता. अधिकाधिक मतदान करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं आवाहन सीमाने यावेळी केले. मतदान हा लोकशाहीला बळकट करणारा महत्त्वाचा घटक असून सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाहीतल्या या अधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट करावी असं आवाहनही सीमाने यावेळी केले. तिचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

रायगड जिल्ह्यातही आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. माणगाव तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत मधील मतदान केंद्रावर मनोज पवार या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर तो वऱ्हाड घेवून लग्नासाठी साताऱ्याकडे निघाला. आज त्याचा लग्नाचाही मुहूर्त आहे. त्यामुळे मतदान करूनच लग्नाला जा, असा आग्रह उमेदवार वरवधू आणि वऱ्हाडी मंडळींना करताना दिसत आहे. 

हेही वाचा - Sad Story: पत्नीचं दु:ख पचवता आलं नाही, निराश पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याचा केला शेवट

लग्नाच्याच वेशात मतदान - 

सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहीजे यासाठी सरकारकडून लाखो रुपये खर्च केले जातात. यामुळे किती प्रबोधन होते हा चर्चेचा विषय असला तरी तळकोकणातील एका नववधूने आपल्या विवाहाच्या मुहूर्तापेक्षा मतदानाच्या हक्काला प्राधान्य देऊन मतदाना बद्दल गंभीर नसलेल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. कणकवली तालुक्यातील लोरे गावातील गीता तेली या युवतीचे तिच्या गावापासून दूर 70 किमी वर दुपारी 12 वाजता लग्न आहे. लग्नमंडपात पोचण्याची धावपळ असतानाच नववधू होण्यासाठी चाललेल्या या युवतीने मतदानाला पहिले प्राधान्य दिले. वऱ्हाडी मंडळीसह ही नवरी थेट मतदान केंद्रावर पोचली. मतदान करून नंतरच ही युवती वऱ्हाडी मंडळीसह बोहल्यावर चढण्यासाठी रवाना झाली. मतदानाच्या हक्काला प्राधान्य देणाऱ्या या नवरीची चर्चा पंचक्रोशीत जोरात चर्चिली जात आहे.  

जालन्यात बोहल्यावर चढण्याआधी एका नवरेदवानं मतदानाचा हक्क बजावला आहे. दीपक राऊत असं या नवरदेवाचं नाव असून त्याचा विवाह परभणी जिल्ह्यातल्या मेघा कोथनगीरे हिच्याशी आज होणार आहे. दुपारी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय. मात्र आज तळणी गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडते आहे. त्यामुळं लग्नाला जाण्याआधी नवरदेव असलेला दीपक याने तळणी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आणि नंतर तो लग्नासाठी निघाला.