पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

 महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला  उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. 

Updated: Feb 28, 2020, 08:37 PM IST
पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या सरकारी निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवारी २ मार्चला मुंबई  उच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याचं परिपत्रकही सरकारकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांनाही प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुट्टी असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे.