कल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा

कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून घेतले होते वडापाव

Updated: Jul 4, 2019, 09:04 PM IST
कल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा title=

कल्याण : कल्याणमध्ये राहणारे संजय भोदादे ,प्रवीण वाघ, आणि कारभारी पवार या तिघांनी बुधवारी संध्याकाळी कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून तीन वडा पाव घेतले. मात्र, हा वडापाव खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

अनेकांना फेरीवाल्याकडून काहीही खाद्यपदार्थ घेऊन खाण्याची देखील सवय असते. पावसाळ्यात बाहेरचे आणि रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला वारंवार दिला जातो. अनेक आजारांना बाहेरच्या पदार्थांमुळे आमंत्रण मिळत असल्याचं दिसून येतं. अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत आहेत.

पालकांनी देखील पावसाळ्यात मुलांना बाहेरचं खाण्यापासून सावध केलं पाहिजे. पावसाळ्यात बाहेरच्या अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.