माजी पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून केली पत्नीची हत्या, त्यानंतर केली आत्महत्या

माजी पोलीस अधिकाऱ्यानं पत्नीची गोळ्या झाडून हत्या करुन स्वतः आत्महत्या केलीय. राजलक्ष्मी नगर देवकर पाणंद इथं हे वृद्ध दाम्पत्य राहत होतं. 

Updated: Jan 30, 2018, 09:38 PM IST
माजी पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून केली पत्नीची हत्या, त्यानंतर केली आत्महत्या title=

कोल्हापूर : माजी पोलीस अधिकाऱ्यानं पत्नीची गोळ्या झाडून हत्या करुन स्वतः आत्महत्या केलीय. राजलक्ष्मी नगर देवकर पाणंद इथं हे वृद्ध दाम्पत्य राहत होतं. 

बबनराव बोबडे हे पोलीस अधिकारी आठ वर्षांपूर्वी मुंबईतून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या वर्षभरापासून बोबडे दाम्पत्य,  मनीषा घोटगे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होते. बबनराव यांनी पत्नी रेखा यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करत स्वतःचं जीवनही संपवलंय. 

देवकर पाणंदमधल्या नीलकमल अपार्टमेंटमध्ये राहणा-या चुलत पुतणीच्या मुलाच्या घरी बोबडे रोज सकाळी जात. मात्र सकाळी ते न आल्यानं त्यांच्या मोबाईलवर फोन केला तो त्यांनी उचलला नाही. बोबडे त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. 

मात्र चावी कुठे आहे याची चिठ्ठी दारावर चिकटलेली होती. यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय. बोबडे दाम्पत्याला दोन मुलं आहेत. एक मुलगा एअर फोर्समध्ये तर दुसरा हॉटेलमध्ये कुक आहे.