पुण्यात काय चाललंय, भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी

Freestyle street fights : पुण्यात भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

Updated: Jul 29, 2022, 09:23 AM IST
पुण्यात काय चाललंय, भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी title=

पुणे : Freestyle street fights in Pune : ज्या शहराची सांस्कृतिक ओळख आहे, त्या पुण्यात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येरवड्यात मारहाणीची घटना घडली. हातात काठ्या घेऊन एकमेकांना हाण्यात आले. भर रस्त्यातील फ्री स्टाईल हाणामारीची जोरदार चर्चा आहे.

येरवड्यातील दृश्य पाहून हे पंजाब असल्याचे वाटत होते. मात्र, ते तर पुणे आहे. येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. भर रस्त्यावर मारामारीचा प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. जागेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. 

येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा लाठी आणि काठ्यांचा नंगानांच सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे नागरिक बोलत आहेत. येरवडा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.