आदित्य ठाकरेंच्या मागावर .. मुख्यमंत्री आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Chief Minister Eknath Shinde Maharashtra tour from today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे.  

Updated: Jul 29, 2022, 10:13 AM IST
आदित्य ठाकरेंच्या मागावर .. मुख्यमंत्री आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर  title=

औरंगाबाद / मुंबई : Chief Minister Eknath Shinde Maharashtra tour from today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे. नाशिकपासून  या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच या दौऱ्यात कुठले मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच मुख्यमंत्री शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तशी तयारी शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी केलेली दिसून येत आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्लात मुख्यमंत्र्यांचा शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा दौराही त्याच पद्धतीने रेखाटण्यात आला आहे. मुख्यमंत्री सर्वप्रथम बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघात येणार आहे.  तिथे रॅली करून मोठी सभा घेणार आहेत.

त्यानंतर संभाजीनगरमध्ये आगमन झाल्यावर प्रशासकीय बैठक ते घेणार मात्र त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील मतदार संघात जाणार आहे. तब्बल पाच तासांचा वेळ तिथे राखीव आहे, तिथे सभा घेणार रोड शो घेणार आहेत. त्यानंतर संभाजीनगरमध्ये येऊन आमदार संदीपान भुमरे यांचं कार्यालय,आमदार संजय शिरसाट यांचं कार्यालय, आमदार प्रदीप जयस्वाल यांचे कार्यालय इथेही भेट देणार आहेत.

संभाजीनगर शहरात सुद्धा त्यांचा मोठा रोड शो आहे त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्लात मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रदर्शन, बंडखोरांचं जोरदार शक्ती प्रदर्शन असं निश्चित या दौऱ्याकडे पाहीले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. थेट बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य यांनी दौरा केल्याने या दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री घेणार अतिवृष्टीचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा अंतिम झाला आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत,  यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी बैठक होणार आहे.. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याचा फटका तब्बल सहा लाख 23 हजार शेतकऱ्यांना बसला आहे.. रविवारी याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने यावर सादरीकरण केलं जाणार आहे.  यात शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे. सोबतच मराठवाड्यातील इतर खोळंबलेली काम आणि नव्या सरकारने स्थगिती दिलेले कामांबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे.