मासा आणि माणसाच्या मैत्रीची अनोखी कहाणी

मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी.. त्याला थोडीशी चाहूल लागली तरी तो दूर पळतो.. मात्र सांगली जिल्ह्यात मासा आणि माणसाच्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.. 

Updated: Sep 2, 2017, 10:22 PM IST
मासा आणि माणसाच्या मैत्रीची अनोखी कहाणी  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया सांगली : मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी.. त्याला थोडीशी चाहूल लागली तरी तो दूर पळतो.. मात्र सांगली जिल्ह्यात मासा आणि माणसाच्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.. 

आज पर्यंत तुम्ही अनेक प्राण्यांच्या मैत्रीच्या कहाण्या ऐकल्या असतील.. मात्र ही कहाणी जरा वेगळी आहे..ही मैत्री आहे एका माशाची आणि माणसाची...मांगूर जातीच्या या माशाला नारायणा नारायणा अशी हाक दिली की हा मासा प्रकाशरावांच्या जवळ येतो.. सांगलीतल्या येडेमच्छिंद्र गावातल्या या माशाला माणसाचा लळा लागलाय..
 
एक वर्षापूर्वी पोटकालव्यातून हा मासा प्रकाश पाटील यांच्या शेतात आला.. मात्र पाणी कमी झाल्यानंतर पाण्याविना हा मासा तडफडत असल्याचं प्रकाशरावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या माशाला गावातील हौदात सोडलं.. महिन्या दोन महिन्यानंतर त्याला त्यांनी शेतातील विहिरीत सोडलं.. सात आठ महिन्यानंतर नेहमीप्रमाणे पाटील जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून पाणी आणण्यास गेले असता हा मासा त्यांच्या पायाजवळ घुटमळत होता... मग सुरु झाला एका मैत्रीचा अध्याय.. प्रकाश पाटलांनी याचं नाव ठेवलय नारायणा..

व्यावहारिक जगात माणसांमधील माणुसकीचा ओलावा कमी होत असला तरी प्राण्यांच्या मैत्रीच्या या कहाण्या माणसांसाठी माणुसकीचे धडेच म्हणावे लागतील.