'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views

Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 7, 2024, 09:20 AM IST
'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views title=
व्हिडीओ चर्चेचा विषय (फोटो - गणेश वनारेंच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरील व्हिडीओवरुन साभार)

Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: ज्या क्षणाची कोट्यवधी गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण आज आल आहे. आज लाखो घरांबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही गणरायांचं आगमन झालं आहे. आजपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पुढील 11 दिवस गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करता येणार आहे. गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे गणेशोत्सवाची दुसरी बाजू दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून व्हिडीओत बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अश्रू अनावर

गणेश वनारे नावाच्या फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन 'द सायलेंट गुडबाय' नावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईतील मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती साकारणाऱ्या कारखान्यामधील कर्मचाऱ्यांचं मनोगत दाखवण्यात आलं आहे. एकीकडे घरोघरी गणराय विराजमान होत असतानाच दुसरीकडे गणपती बाप्पा कारखान्यातून निघून गेल्यानंतर त्यांना सजवणाऱ्या, आखीव-रेखीव रुप देणाऱ्या मूर्तीकारांनाही अश्रू अनावर होतात हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे. कारखान्यामध्ये शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेक मुंबईकर भारावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये बोलणाऱ्या मूर्तीकाराचं नाव रोहन मोरे असं आहे.

शेवटचा दिवस असा येतो की...

व्हिडीओ बाप्पांच्या मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर मूर्तीकार म्हणून काय वाटतं हे रोहन अगदी मनमोकळेपणे सांगताना दिसत आहे. बाप्पा कारखान्यातून निघतात तेव्हा रडू येतं असं हा तरुण मूर्तीकार सांगतो. 'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा कारखान्यातून बाहेर पडतो. कारखाना जसा रिकामा होत जातो ना त्या टाईमाला आम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजे दोन महिने आम्ही बाप्पाशी एकरुप झालेलो असतो. तो एक बॉण्ड तयार झालेले असतो आणि त्यानंतर बाप्पा आम्हाला सोडून चालेला असतो. तो तुमच्यासाठी आनंद असतो की 11 दिवस आमच्या घरी बाप्पा येत आहेत. आमच्यासाठी तो थोडा वाईट वाटण्याचा क्षण असतो,' असं व्हिडीओमधील मूर्तीकार रोहन मोरे सांगताना दिसत आहे.

नक्की वाचा >> Zee 24 तास पाहा, सोन्याची नाणी जिंका! गणेशोत्सव स्पर्धेची सविस्तर माहिती एका क्लिकवर

विशेष म्हणजे नंतर रोहन, "शेवटचा दिवस असा येतो की जेव्हा लोकांच्या घरी बाप्पा येतो आणि हा कारखाना पूर्ण रिकामा होतो. ते बघून असं वाटतं की पुढचं वर्ष कधी येणार आणि हे आपण कधी पुन्हा अनुभवणार? याच भावानेनं आम्ही सगळे काम करत असतो," असं रोहन सांगतो. 

1 कोटी 40 लाखांहून अधिक व्ह्यूज

या व्हिडीओला दोन दिवसात 1 कोटी 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Vanare (@haram_khor_)

भारावून गेले नेटकरी...

'या दुसऱ्या बाजूचा आपल्यापैकी अनेकजण कधी विचारही करत नाही,' असं एकाने या व्हिडीओवरील कमेंटमध्ये म्हटलं आहे. अन्य एकाने, 'हा व्हिडीओ मास्टरपीस आहे. याला कधीच मरण नाही असा हा व्हिडीओ आहे,' असं म्हटलंय. "यालाच तर खरा कलाकार म्हणतात, जो पूर्ण भावनेने, निरपेक्षपणे कला सादर करतो," असं अन्य एकाने म्हटलं आहे. काही तासांमध्ये व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत.