दिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ

पार्किंगमधील कारमधून बॅग लंपास करण्याचा या टोळीचा हातखंडा.

Updated: Oct 26, 2018, 05:26 PM IST
दिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ title=

नागपूर : कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीनं नागपूरमध्ये हैदोस टाकलाय. या टोळीनं अवघ्या पाच तासात चार जणांच्या कारमधून रोख आणि मौल्यवान वस्तू असलेल्या बॅग लंपास केल्याचं समोर आलंय. बुधवारी दुपारी 2 ते 7 या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या.

हॉटेल सेंटर पॉईंट समोर चोरी करताना ही टोळी सीसीटीव्हीत चित्रीत झालीय. शहरातील सीताबर्डी आणि बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटलेल्या या घटनांनी खळबळ उडालीय. शहरातील लुटीच्या इतर घटनाही अशाच पद्धतीनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारची काच फोडून करण्यात आल्यात. 

दरम्यान, पार्किंगमध्ये कार चोरी करण्यासाठी अण्णा टोळीचे सदस्य स्वत:चेच पैसे जमिनीवर टाकून तुमचे पैसे पडलेत असे चालकाला किंवा गाडी मालकाला सांगतात. पैसे घेण्यासाठी ते खाली वाकले की लगेच कारमधून बॅग लंपास करण्याचा सहज ही टोळी प्रयत्न करते आणि निघून जाते.