BREAKING : पुण्यात दोन टोळ्यांमध्ये गँगवॉर, भररस्त्यात गोळीबार

दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Updated: Oct 22, 2021, 04:48 PM IST
BREAKING : पुण्यात दोन टोळ्यांमध्ये गँगवॉर, भररस्त्यात गोळीबार

पुणे : पुणे इथल्या उरळीकांचन इथं गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. उरळीकांचन आणि लोणीकाळभोर दरम्यान तळवडे फाट्याजवळील चौकात गोळीबाराची घटना घडली. दोन टोळ्यातील जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. अवैध धंद्यांवरुन दोन टोळ्यांमध्ये वाद होता. 

या वादातून दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. संतोष जगताप आणि इतर दोघे असे तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.