किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर केला जातोय. विसर्जनावेळी नदीपात्रांसह कुंडातील पाणी प्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातात. मात्र नाशिकमध्ये पहिल्यांदाच एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर चक्क पाणी शुद्ध करणार्याच बाप्पांची निर्मिती केली जाते आहे.
अवघ्या काही दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपल्याने स्वागताच्या तयारीला वेग आला आहे. त्यातच सर्वात महत्वाची निवड असते ती म्हणजे गणरायाच्या मूर्तीची. मूर्तीच्या रंगापासून ते कोरीव कांपर्यंत बारीक सारिख गोष्टी पहिल्या जातात. त्यात अलीकडे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापना करायची हा एक ट्रेंडच सुरू झालाय. त्यात पर्यावरणाला हानी पोहचणार नाही यासाठी शासनासह अनेक सेवाभावी संस्थाही काम करतात. काहीशा प्रमाणात त्यांना यशही येत.
मात्र त्यातच आता आणखी भर पडलीय ती नाशिकमध्ये करण्यात आलेल्या एका प्रयोगाने. विसर्जन केल्यानंतर चक्क पाणी शुद्ध करणार्याच बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जाताय. नाशिकमधील मिट्टी फाउंडेशन च्या मोरे यांनी हा प्रयोग केलाय.
मोरे कुटुंब गेल्या चार पिढिंपासून मूर्ती घडविण्याचे काम करत आहे. शाडूच्या माती वितिरिक्त कुठल्याच प्रकारचे गणपती याठिकाणी तयार होत नाही. ट्रेंडीगच्या मूर्ती एवजी ते जुने संदर्भ आणि वारसा असलेल्या मूर्ती घडविण्यात भर देतात. व्यवसाय म्हणून न बघता आपला वारसा जपण्यात अधिक भर देतात. इतकच काय तर प्रदूषण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. नाशिकमध्येच नव्हे तर जगभरात मोरे बंधुचे गणपती परदेशात जातात. यंदाही परदेशात गणपती पाठविले आहे.
या मूर्तीमध्ये तुरटीसह सेल्युलोज, गावरान गाईचे शेण व भौगोलिक परिस्थितीनुसार स्वदेशी बीज यांचा वापर करण्यात आला आहे. साधारपणे २ ते ३ किलो वजनाच्या मूर्तीत अंदाजे ३ हजार लिटर प्रदूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. सदर मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यामधील सेंद्रीय द्रव्ये तेथील पाण्याचे शुद्धीकरण करणारे जिवांणूसाठी खाद्य म्हणून उपयोगात येते. शिवाय पीओपीच्या मूर्तीमुळे व त्यातील घातक रंगांमुळे होणारे प्रदूषणही बर्याच प्रमाणात होणार आहे. त्यामुळे यंदाही पर्यावरण पूरक गणेशोस्तव व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.