Gautami Patil : सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) एक झलक पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी झाली आहेत. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमाचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गौतमी पाटीलच्या डान्समुळे नाही तर या कार्यक्रमाला झालेल्या तुफान गर्दीमुळे व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोरं झाडावर चढल्याची दिसत आहे. तर, पोलिस हातात लाठ्या घेवून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. उस्मानाबादमधील (Osmanabad Gautami Patil Dance Video Viral) हा व्हिडिओ आहे.
उस्मानाबादमध्ये 4 डिसेंबरला गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रम पार पडला. तुळजापूर तालुक्यातील वडगावमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.
या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा लावणी डान्स पाहण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीमुळे गौतमीचा डान्स दिसत नसल्याने काही अतिउत्साही तरुण थेट झाडावर चढले.
व्हिडिओमध्ये झाडावर चढलेल तरुणाचं घोळक दिसत आहे. कार्यक्रमस्थळीवरील गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने आयोजकांनी पोलिसांना बोलावले. गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ आले. कार्यक्रमक संपल्यानंतर देखील अनेकांनी थेट गौतमीशी बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस बंदोबस्तातच गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडावे लागले.
महिनाभरापूर्वी सांगलीमध्ये (Sangli) बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. दत्तात्रय विलास ओमासे (44) असं मृत्यू व्यक्तीचं नाव आहे. गर्दीत दत्तात्रय ओमासे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. या कार्यक्रमात देखील प्रेक्षकांची अशीच हुल्लडबाजी पाहायला मिळाली होती. गौतमीला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. यावेळी घरांच्या, शाळेच्या छतावर, झाडावर बसून प्रेक्षक गौतमी पाटीलचा डान्स पाहत होते.
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील चर्चेत आलेय. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी गौतमीची कानउघाडणी केली होती.