सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुंदर हस्ताक्षर (Handwriting) हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी शाळेत असताना शिक्षकांकडून हस्ताक्षर सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. सुंदर हस्ताक्षरामुळे शाळेत अनेकदा कौतुकही होतो. पण पुण्यातल्या एका निर्दयी शिक्षिकेने विद्यार्थ्याचे हस्ताक्षर सुंदर नसल्याने बेदम मारहाण केलीय (teacher beating up student). कहर म्हणजे मारहाण केल्याचे घरी सांगितल्यास आणखी मारहाण करेल अशी धमकीही या शिक्षिकेने दिली होती. याप्रकरणी आता या शिक्षाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
पुण्यात 6 वर्षीय मुलाचे अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने या मुलाला मारहाण केली. मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर आणखी मारेल अशी धमकीही या मुलाला देण्यात आली. मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर धमकी
लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात हा सर्व प्रकार घडलाय. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा सहा वर्षीय मुलगा लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकण्यास आहे. या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे शिक्षिकेने त्याला हाताने बेदम मारहाण केली. जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेल अशी धमकीही या शिक्षिकेने दिली. तक्रारीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.