व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविल्याने तरुणीसह तिच्या आईवर गोळीबार, एकाला अटक

 व्हाट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मेसेज पाठविला म्हणून कोल्हापूरातील एका तरुणीवर आणि तिच्या आईवर विवाहित पुरुषाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार (Kolhapur Firing) केल्याची घटना घडली आहे.  

Updated: Sep 18, 2021, 11:59 AM IST
व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविल्याने तरुणीसह तिच्या आईवर गोळीबार, एकाला अटक title=

कोल्हापूर : Whatsapp Message : व्हाट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मेसेज पाठविला (Message on WhatsApp) म्हणून कोल्हापूरातील एका तरुणीवर आणि तिच्या आईवर विवाहित पुरुषाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार (Kolhapur kalamba Firing) केल्याची घटना घडली आहे. छरे लागून संबंधित तरुणी आणि तिची आई जखमी झालीत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयित आरोपी ऋषिकेश कोळी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऋषिकेश कोळी याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचगावमधील मगदूम कॉलनी इथे रहाणाऱ्या ऋषिकेश कोळी यांच्या मोबाईलवर जखमी झालेल्या तरुणीने व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविला. तो मेसेज ऋषिकेशच्या पत्नीने वाचला. त्यानंतर त्याच्या पत्नीने थेट संबंधित तरुणीला फोन करून तुझ्या घरी येवुन सोक्षमोक्ष लावते, असे म्हटले. त्यावेळी तरुणीच्या आईने घरात नको कळंबा तलाव परिसरात ये असा निरोप दिला.

ऋषिकेश आणि त्याची पत्नी हे दोघे चारचाकी वाहनाने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांनी संबंधित तरुणीला मारहाण केली. आईने हस्तक्षेप करत दोघांना ढकलून दिले. त्यामुळे संतापलेल्या ऋषिकेशने गाडीत ठेवलेल्या बंदुकीने तरुणीवर आणि आईवर गोळीबार केला. त्यामध्ये संबंधित तरुणी आणि आई जखमी झालेत.