मुंबई-गोवा माहामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त

मुंबई-गोवा माहामार्गावर तीम लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाकामध्येही कारवाई करण्यात आली.

Updated: Sep 6, 2017, 04:48 PM IST
मुंबई-गोवा माहामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त title=

चिपळून : मुंबई-गोवा माहामार्गावर तीम लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाकामध्येही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी स्कोडा गाडीसह एकाला अटक करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाकामधून एका कारमधून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागानं त्याठिकाणी सापाळा रचला आणि गाड्यांची तपासणी करत असताना एका स्कोडा गाडीमध्ये विविध ब्रँडचे दारुचे बॉक्स मिळून आले. या 46 बॉक्स दारुची एकूण किंमत 3 लाख 12 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी संतोष मोरेला ताब्यात घेण्यात आलं आहे.