रत्नागिरी : कुरिअरच्या नावाखाली मुंबईकडे येणारा गोवा बनावटीचा अवैध दारूचा मोठा साठा रत्नागिरीत जप्त करण्यात आला आहे.
परदेशात कुरिअरच्या माध्यमातून किंमती मौल्यवान वस्तू कुरिअरच्या माध्यमातून चालल्यात असं दाखवण्यात आलं.
मात्र रत्नागिरीच्या राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या भरारी पथकानं अत्यंत हुशारीने कुरिअरच्या नावाखाली चाललेला अवैध धंदा उघड केला आहे.
या गाडीत तब्बल ४० बॉक्स आढळून आले. एका बाँक्समध्ये तब्बल ४८ बाटल्या हुशारीने भरण्यात आल्या होत्या. यांची किंमत ९ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. आज झालेल्या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहेत.