पणजी बस स्टँडला लागलेल्या आगीत करोडोंचं नुकसान

बस स्टँडच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीत १ कोटी रूपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे. 

Updated: Oct 2, 2017, 03:11 PM IST
पणजी बस स्टँडला लागलेल्या आगीत करोडोंचं नुकसान title=

पणजी : पणजीत बस स्टँडला लागलेल्या आगीत राज्य परिवहन विभागाचं कार्यालय जळून खाक झालं आहे. घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. आग सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी लागली होती. 

आग ही पणजी बस डेपोच्या खालच्या मजल्यात असलेल्या सुपरमार्केटमध्ये लागली, त्यानंतर आगीने वरचा मजला गाठला आणि आणखी तीव्र होत गेली. 

अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्यांनी तीन ते साडेतीन तासात आग विझवली. राज्य परिवहन विभागाची मोठ्या प्रमाणात कागद पत्र जळून खाक झाली.

बस स्टँडच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीत १ कोटी रूपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे.