'गोकुळ वादळी वार्षिक सभे'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात कडेकोट बंदोबस्त

दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 30, 2018, 09:10 AM IST
'गोकुळ वादळी वार्षिक सभे'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात कडेकोट बंदोबस्त  title=

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची ५६ वी वार्षिक सभेचं आज आयोजन करण्यात आलय. यासभेत दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या सभेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे सभेत रणकंदन होण्याची शक्यता आहे.

वादळी सभा 

 सत्ताधारी नेते माजी आमदार महादेव महाडिक, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांच्यासह अनेक नेते एकीकडे तर विरोधी नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर नेते एकीकडे असं चित्र सभेत पहायला मिळेल. 

पोलिसांचा बंदोबस्त 

  या वादळी सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोल्हापूरातील ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या मुख्य कार्य़ालयाजवळ ही वादळी सभा पार पाडणार असून सभास्थानी ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच लक्ष आजच्या गोकुळच्या वार्षिक सभेकडं लागून राहिलयं.