सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 29, 2024, 11:43 AM IST
सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्या title=
gold price 29th july Gold Silver price up today check latest rates in mumbai maharashtra

Gold Price Today: मागील आठवड्यात कमोडिटी बाजारात सोन्याच्या दर कोसळले होते. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मौल्यवान धातुच्या किमतीत तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानंतर भारतीय वायदे बाजारात पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं आज MCX (मल्टी कमोडिटी एक्सेचेंज) वर 160 रुपयांनी महाग झाले आहे. आज बाजारात सोनं 69,160 रुपये 24 कॅरेट प्रतितोळा इतके आहे. तर चांदीदेखील 588 रुपयांच्या तेजीसह 81,959 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत. तर, मागील सत्रात चांदी 81,371 रुपयांवर स्थिरावली होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वाढले?

मागील शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 टक्क्यांने वाढले होते. महागाईचे आकडे समोर आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणखी मजबूत झाली आहे.. त्याचबरोबर दोन वर्षांनी कपात होऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1 टक्क्यांनी वाढून 2,388 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. तर, गोल्ड फ्युचर्स 1.2 टक्क्यांनी वाढून 2,381 डॉलर वर पोहोचले आहे. 

आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर स्थानिक सराफा बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील तीन सत्रात सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आता किंचित वाढ दर्शवत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात 69,160 रुपये 24 कॅरेट प्रतितोळा आहे. तर 22 कॅरेट प्रतितोळा 63,400 रुपयांवर स्थिरावले आहे. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  63, 400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   69, 160 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   51, 880 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 340 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   6, 916 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 188  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   51, 200 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   55, 856  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52, 370  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  50, 720 रुपये
24 कॅरेट-  55, 328 रुपये
18 कॅरेट-  51, 880 रुपये