आमच्याकडे पुरावे; 3 तासात तुमचा पर्दाफाश करणार, अनिल देशमुखांना भाजपकडून प्रतिआव्हान

Chitra Wagh Reply to Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 29, 2024, 11:21 AM IST
आमच्याकडे पुरावे; 3 तासात तुमचा पर्दाफाश करणार, अनिल देशमुखांना भाजपकडून प्रतिआव्हान title=
चित्रा वाघ यांचे देशमुखांना गंभीर आरोप

Chitra Wagh Reply to Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. समित कदम या व्यक्तीला फडणवीसांनी माझ्याकडे पाठवले होते. त्याच्याकडे एक प्रतिज्ञापत्र होते, त्यावर सही करण्यास मला सांगण्यात आले होते. आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांना अडकवण्याचा फडणवीसांना प्लान होता.तसेच अमित कदम आणि फडणवीसांचे घरचे संबंध आहेत, असे आरोप देशमुखांनी फडणवीसांवर केले होते.  या आरोपांच्या काही वेळातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन त्यांना प्रत्युत्तर दिलंय. 

फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते अनिलबाबू…यात कसला आला पराक्रम..? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल..?
आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे का देत नाहीत..? असा प्रश्न त्यांनी अनिल देशमुखांना विचारला आहे.

त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत..!, असे आव्हान चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिले आहे.

फडणवीसांवर काय आरोप?

तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं. ते माझ्याकडे एफिडेव्हिट घेऊन आले होते. समित कदम यांचे आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिलीय. राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मी तेव्हा सही केली असती तर उद्धव ठाकरे जेल मध्ये असते. समित कदम काळा की गोरा हे मी कधी पाहिलं नाही, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा फडणविसांचा डाव होता. जर मी त्या एफिडेविटवर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झालाआदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 करोड रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता, अशी माहितीही देशमुखांनी दिली.