गणपती मंदिरातून लाखाचे दागिने लंपास

गणपतीचे एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2018, 03:52 PM IST

सांगली : सांगलीच्या हरिपूर इथल्या बागेत असणा-या गणपती मंदिरात चोरी झालीय. रात्री दोन वाजता हा प्रकार घडलाय. 

गाभा-यातील लोखंडी कपाट तोडून गणपतीचे एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. 

घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तसंच ठसे तज्ज्ञ, श्वान पथकही घटनास्थळी पोहचलेत.