पदवीधर, शिक्षक निवडणूक : महाविकास आघाडीचा भाजपला दे धक्का, ४ जागा आघाडीकडे तर १ अपक्षाकडे

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.  

Updated: Dec 3, 2020, 11:18 PM IST
पदवीधर, शिक्षक निवडणूक : महाविकास आघाडीचा भाजपला दे धक्का, ४ जागा आघाडीकडे तर १ अपक्षाकडे  title=

मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, भाजपला धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यात यश मिळाला आहे. मात्र, महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिल्याचे चित्र दिसून येत आहे. निकाल रात्री उशिरापर्यंत हाती आलेले नव्हते. मात्र, चार ठिकाणी महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती. तर अमरावती येथे अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली.

पदवीधर व शिक्षकच्या पाच पैकी चार जागांवर मात्र महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुण्यात भाजपने आक्षेप घेतला आहे. पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात तीन वाजता सुरुवात झाली. प्रथम पसंती आणि प्राथमिक कल हे महाविकास आघाडीच्या बाजुने दिसून येत आहेत. या ठिकाणी भाजपला जोरदार धक्का बसल्याचे चित्र होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघात अरुण लाड यांनी मुसंडी मारत भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर गेले आहेत. तर शिक्षक मतदारसंघाच काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत.

भाजपचा गडात आघाडीची मुसंडी

नागपूर पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२ हजार ६१७ तर भाजपचे संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत नितीन रोंघे यांना ६६, नितेश कराळे यांना १ हजार ७४२ तर राजेंद्र भुतडा यांना ४३५ मते मिळाली आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या फेरीत २३०० मते मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांना फक्त ६६६ मते मिळाली.

औरंगाबाद पदवीधर निवडणूक 

दुसऱ्या फेरी अखेर 

राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना 54477 मत

भाजपचे शिरीष बोराळकर याना 25547 मत

चव्हाण यांना 28930  मतांची  आघाडी

नागपूर पदवीधर मतदारसंघ

दुसऱ्या फेरीअखेर अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण 7 हजार 334 मतांची  आघाडी

दुसऱ्या फेरीत  काँग्रेसचे अभिजित  वंजारी यांना 11,497 मतं

तर संदीप जोशी जोशी यांना 9,085  मतं

दुसऱ्या फेरीत अभिजित वंजारी यांना 2412 मतांची  आघाडी

औरंगाबाद पहिली फेरी अधिकृत जाहीर

सतीश चव्हाण 27250

शिरीष बोराळकर 11272 

चव्हाण 15978 मतांनी पुढे

अमरावती शिक्षक मतदार संघ

अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणीत अपक्ष उमेदवारांने आघाडी घेतली आहे. या ठिकाणी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सातव्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार होता. रात्री उशिरापर्यंत निकाल हाती आलेला नव्हता. दुसऱ्या राउंड नंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर. 30918 हजार मतांची मोजणी पूर्ण...

किरण सरनाईक,अपक्ष  3131+2957= 6088

श्रीकांत देशपांडे(महा विकास आघाडी) 
2300+2822 = 5122

शेखर भोयर,अपक्ष 
2078 +2811=  4889

संगीता शिंदे अपक्ष उमेदवार
1304+1553=2857

औरंगाबादेत आघाडीला आघाडी

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 मते

भाजपचे शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळाली

पहिल्या फेरीत 16 हजार 906 मतांची सतीश चव्हाण यांना आघाडी

नागपूर भाजपला पहिल्या फेरीत धक्का

पदवीधर निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर  

भाजपचे संदीप जोशी यांना पहिल्या फेरीत धक्का