किराणामालाचे दर घटल्यानं दिवाळीचा फराळ अधिक चविष्ट

दिवाळी तोंडावर आली असताना घरोघरी फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. अशा वेळी फराळाचा कच्चा माल स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय. गतवर्षीच्या तुलनेत डाळी, पोहे, बेसन याचे दर 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास घटलेत. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर कडाडल्यानं स्वयंपाकघराचं बजेट मात्र कोलमडल्याचं चित्र आहे. 

Updated: Oct 10, 2017, 06:56 PM IST
किराणामालाचे दर घटल्यानं दिवाळीचा फराळ अधिक चविष्ट title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : दिवाळी तोंडावर आली असताना घरोघरी फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. अशा वेळी फराळाचा कच्चा माल स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय. गतवर्षीच्या तुलनेत डाळी, पोहे, बेसन याचे दर 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास घटलेत. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर कडाडल्यानं स्वयंपाकघराचं बजेट मात्र कोलमडल्याचं चित्र आहे. 

सध्या सर्वत्र वाढत्या महागाईविरोधात ओरड सुरु आहे. असं असताना दिवाळसणाच्या तोंडावर गृहिणींना दिलासा ठरू शकेल एक गुड न्यूज आहे. दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या बहुतेक चीजांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत उल्लेखनीय म्हणावे इतके कमी झाले आहेत. त्यामुळे यावर्षी दिवाळी सरंजामाचा बोजा काही प्रमाणात कमी होणार आहे

तूरडाळ :  गेल्या वर्षी -125 रुपये किलो , यावर्षी - 80 रुपये किलो 

हरभराडाळ : गेल्या वर्षी - 140 रुपये किलो , यावर्षी - 80 रुपये किलो 

उडीदडाळ : गेल्या वर्षी - 110 रुपये किलो यावर्षी -70 रुपये किलो 

भाजकी डाळ : गेल्या वर्षी 150 रुपये किलो , यावर्षी - 95 रुपये किलो 

पोहे  : गेल्या वर्षी 45 रुपये किलो, यावर्षी - 40 रुपये किलो 

बेसन :  गेल्या वर्षी 150 रुपये किलो, यावर्षी - 90 रुपये किलो 

तेल तूप वगळता फराळासाठी लागणाऱ्या वाण सामानाचे भाव यावर्षी ३० ते ४० टक्कयांनी कमी झाले आहेत. कच्या मालाची उपलब्धता आणि मागणी यांतील गुणोत्तर भाव कमी होण्यास कारणीभूत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. 

दिवाळीचा फराळ घरी बनवणाऱ्या गृहिणींसाठी हा दिलासा आहे. असं असलं तरी साखर, तेल- तूप  तसेच सुक्या मेव्याच्या भावांत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे काही गोष्टींचे भाव कमी झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच इतरही गोष्टींमध्ये स्वस्ताई यावी अपेक्षा गृहिणी व्यक्त करतात. 

यावर्षी घरच्या फराळाचा खर्च कमी होणार असला तरी बाजारातील तयार फराळाचे भाव वाढलेलेच असणार आहेत.  कच्या मालाची आगाऊ खरेदी,  कामगारांची मजुरी तसेच इतर कारणामुळे तयार फराळाचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे यंदाचा दिवाळी फराळ आर्थिक दृष्ट्याही खट्टा - मिठा स्वरूपाचा असणार आहे.