गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली?

Gunaratna  Sadavarte  judicial custody : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. ( Court sends lawyer Gunaratna  Sadavarte judicial custody ) 

Updated: Apr 20, 2022, 02:22 PM IST
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली? title=

मुंबई : Gunaratna  Sadavarte  judicial custody : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. ( Court sends lawyer Gunaratna  Sadavarte judicial custody ) एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातील एका प्रकरणात सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना 26 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर साताऱ्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचा-याकडून 550 रुपये घेतल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. तर सदावर्तेंनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडताना सर्व आरोप खोडून काढलेत. कोर्टाच्या कामकाजासाठी पैसे घेतल्याचा त्यांचा दावा आहे. 

सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. दरम्यान, सातारा 2020 मधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

सदावर्ते यांना गेल्या आठवड्यात सातारा शहर पोलीसांनी त्यांच्या मुंबईतील सहकार्‍यांकडून ताब्यात घेतल्यानंतर अटक केली होती. ज्यांनी त्यांना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांना धडक देऊन केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणात अटक केली होती.

न्यायालयात सुनावणीच्यावेळी काय झाले?

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद

- पैसे मोजण्याचे मशीन, कागदपत्रे सदावर्ते यांच्या घरातून मिळाले आहेत
- आगामी चौकशी करायची आहे
- दुकानं विकत घेतली आहेत, भायखळ्याला एक दुकान विकत घेतले आहे
- केरळ इथून एक लिमोझीन गाडी विकत घेतली आहे,
- 550 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून गोळा केले, त्यातून ही संपत्ती खरेदी केल्याचा संशय
- विविध कोर्ट निकालाचे संदर्भ देत आहेत
- घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल दाखला म्हणून वाचून दाखवला
- आरोपी स्वतः वकील आहे त्यामुळे कोठडी घेऊनच चौकशी करणं गरजेचं आहे, अन्यथा तपास भरकटेल
- गरीब कर्मचाऱ्यांकडून सदावर्ते यांनी पैसे वसूल केले
- एवढे पैसे जमा केले की त्यांना पैसे मोजण्याची मशीन लागली
- कर्मचाऱ्यांकडून मी एकही पैसा घेतला नसल्याचे लेखी सदावर्ते यांनी लिहून दिले आहे
- सदावर्ते मी एकाही कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले नाहीत एकही रुपया घेतला नाही अस वारंवार म्हणायचे पण आता म्हणतायत की पैसे घेतले
 
सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद केला

- पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करताहेत की हा एक मोठा स्कॅम आहे 
- मी ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता 
- इथे आर्थिक घोटाळा झाल्याचे सांगितले जाते
- पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करताहेत की हा एक मोठा स्कॅम आहे 
- 48 हजार याचिककर्त्यनाच्या नावाने याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती
 - मी ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता 
- एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे
- कागदपत्र जप्त केले ते वकालत नामा आहेत 
- माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे
-कागदपत्र जप्त केले ते वकालत नामा आहेत 
- नोट मोजायचे मशीन 3000 रुपयाची..कामकाजाच्या सुविधेसाठी घेण्यात आली
- मी मालमत्ता घेतल्या त्या बँक transection रेकॉर्ड वर आहेत..
- जी गाडी घेतली ती सेकंड हॅण्ड..
- माझा स्वातंत्र्यसैनिक असलेली सासूला यात्रेसाठी गाडी घेतली..
- गाडी जुनी आहे २०१४ ची जुनी गाडी मी खरेदी केलीये