राज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, आरोग्यमंत्र्यांचे रक्तदान करण्याचे आवाहन

संचारबंदीच्या काळात शिस्त पाळून रक्तदान करण्याचे आवाहन 

Updated: Mar 27, 2020, 01:18 PM IST
राज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, आरोग्यमंत्र्यांचे रक्तदान करण्याचे आवाहन  title=

मुंबई : राज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याची चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. संचारबंदीच्या काळात शिस्त पाळून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

महासंकटात असंवेदनशीलता दाखवू नका, मेडिकल प्रॅक्टिस सुरुच ठेवा असे त्यांनी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. अनेकजण काही ना काही कारणामुळे दवाखाने बंद ठेवत आहेत. त्यांनी असे करु नये असे आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोना व्यतिरिक्त अनेक आजारांच्या रुग्णांना यावेळी गरज असते. त्यामुळे हॉस्पिटल्स, लॅब्स सुरु ठेवाव्यात असे आरोग्यमंत्री म्हणाले.

पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना दांडग्याने मारल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी सौजन्यानं वागावं असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. संचारबंदी सुरु आहे.

आता जे रुग्ण आहेत ते एकतर बाहेरुन आलेले आहेत किंवा बाहेरुन आलेल्यांच्या संपर्कात आलेले आहेत.

त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहे. ते निरोगी होऊन बाहेर देखील पडत आहेत. त्यामुळे डिस्चार्ज रेट वाढतोय हे दिलासादायक असल्याचे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.